Sunday, June 5, 2011

एक झकास विक एंड

 वाह!! मस्तं गेला विक एंड. शनिवारी ऑफिस तर्फे Movie (Ready) आणि रविवारी संध्याकाळी लोणावळा. अर्थात काही कारणामुळे Movie बघायला जायचा अजिबात मूड नव्हता पण हो नाही करत कसा तरी ४.३० वाजता Interval पर्यंत पोचलो. आता तुम्ही म्हणाल की Interval पर्यंत का? तर त्याच कारण असं की Show ३.३० चा होता. म्हणून मग थोडं खाल्लं आणि आत मध्ये गेलो. पण आधी काय झाल आहे हे काहीच माहित नसल्यामुळे बघण्याचा इंटरेस्ट गेला होता. तरी पण थोडावेळ बसलो आणि साधारण ५.१५ ला तिथून मित्राला काहीतरी कारण सांगून तिथून पळ काढला आणि थेट घरी आलो.

पण रविवार मस्तं गेला. सकाळी आरामात उठलो. दुपार पर्यंतचा दिवस घरीच गेला त्यामुळे खूप कांटाळ आला होता. म्हणून मग बाहेर पडायचं ठरवतच होतो तेवढ्यात मित्राचा फोन आला आणि तो म्हणाला "मस्तं पाउस आहे लोणावळ्याला जायचं का फिरायला"? हे ऐकल्याबरोबर क्षणाचाही विचार न  करता हो म्हणलं आणि कार काढली.  अजून दोघा मित्रांना फोन केला.  कुठे भेटायचं हे ठरलं आणि त्याप्रमणे सगळे वेळेत पोचले (?) आता निघायला जवळपास ५.३० वाजले होते. तिथे पोहोचेपर्यंत बराच अंधार होणार हे माहित होत म्हणून मग अधेमध्ये कुठेही न थांबण्याचा एकमताने ठराव पास झाला.

वातावरण एकदम झकास होतं. आजूबाजूचा परिसर एवढ्या पावसाने सुद्धा हिरवागार दिसत होता. ते बघून मला सोनू निगम ने गायलेल्या "हिरवा निसर्ग हा भवतीने" ह्या गाण्याची आठवण झाली.  आता उजेड आणि अंधार ह्यामधलं अंतर कमी होत होतं तसा गाडीचा वेग वाढत चालला होता.

शेवटी अंधाराच्या आत आम्ही लोणावळ्याला पोचलो आणि तडक Tiger Hill  ला जाण्यचा निर्णय घेतला. पण Traffic  मध्ये १५-२० मिनिटे वाया गेली त्यामुळे शेवटी जे व्हायचं तेच झालं. तिथे पोचेपर्यंत जवळपास अंधारून आलं होतं. आम्हाला असं वाटलं की उशीर झाल्यामुळे आमच्या चौघांशिवाय तिथे कोणी नसेल पण अजूनही गर्दी होती. भरपूर धुकं होतं आणि अंधारही खूप झाला होता म्हणून मग जमेल तसे फोटो काढले.
अंधारात काढलेले फोटो ते त्यामुळे यायचे तसेच आले.
फोटो काढताना लक्षात आलं की आमच्यातला एकजण गायब आहे. त्याचा mobile  पण लागत नव्हता. "कुठे जायचं होतं तर सांगून तरी जायचं" असं आमच्यातला एकजण वैतागून म्हणाला. तेवढ्यात अंधारात कोणीतरी चाचपडत येताना दिसलं. जरा नीट बघितलं तर आमचंच " ध्यान " होतं. आम्ही त्याच्यावर ओरडणार तेवढ्यात तो म्हणाला " दोस्तो गरमा गरम Onion  पकोडे और चाय लाया हुं"  हे ऐकून पुढची होणारी  बा (चा ) आणि बा (ची ) वाचली. मग काय सगळ्यांनी मस्त पकोडे आणि चाय ह्यावर ताव मारला. पावसाळ्यात आणि थंड  हवेच्या ठिकाणी भुट्टा (कणीस) नाही खाल्ला तर तो Foul धरतात. म्हणून मग नंतर सगळ्यांनी कणसाच्या गाडी कडे आगेकूच केली.

वातावरण इतकं छान होतं की तिथून निघावं वाटत नव्हतं. पण अंधारही भरपूर झाला होता आणि गर्दी सुद्धा कमी झाली होती. म्हणून मग तिथून निघालो आणि लोणावळ्याची Special चिक्की घेतली आणि परतीचा मार्ग धरला आणि विक एंड चा end  मस्त झाला.




Friday, April 1, 2011

निशीलॅंड वॉटरपार्क

साधारण १५-२० दिवसापूर्वी ऑफिस सुटायची वेळ झाली आणि तेवढ्यात मेनेजर म्हणाला १० मिनिटात मीटिंग आहे. असं म्हण्ल्याबरोबर मी सगळ्यांकडे १ नजर टाकली तर सगळ्यांच्या चेहेर्र्यावर "च्यायला ह्याला आत्ताच काय बोलायचं आहे" असा भाव होता...पुढच्या १० मिनिटात मीटिंग सुरु झाली आणि समजलं की २७ मार्चला (रविवारी) ऑफिस पिकनिक आहे. हे ऐकल्याबरोबर कुठे जाणार ह्या विषयावर कुजबुज चालू झाली. पण कुठे जाणार हे ऐकून सगळ्या तर्क वितर्कावर पाणी फिरले..कारण ते ठिकाण होतं Nishiland Water Park.  कोण कोण येणार असं विचारल्यावर अर्ध्या लोकांनी नकार घंटा वाजवली. अर्थात त्यात मी पण होतोच म्हणा.

बहुतेक त्या दिवशी सगळ्या प्रोसेस मध्ये हे सांगण्यात आलं असावं. कारण सगळ्यांचा चर्चेचा हाच विषय होता. तसा तो आमच्या कॅब मध्ये सुद्धा होताच पण अगदी थोडावेळ. कारण आमच्या कॅब मध्ये कुठल्याही विषयाला ५ मिनिटाचा लॉकिंग पिरेड आहे. असो!! ह्या विषयवार परत कधीतरी चर्चा करू.

एक एक दिवस जसा जवळ येत गेला तशी येणार्र्यांची डोकी वाढत गेली. मग त्यामध्ये स्वतंत्र ( Self ) येणार्र्यांची संख्या जास्तं होती. अखेर तो दिवस उजाडला!!!  जे येणार नाही म्हणले होते ते आले आणि जे येणार म्हणले होते त्यांचे Plan अचानक (?) बदलले.

सकाळी ८.१५ वाजेपर्यंत बस Pickup Point ला येईल असं सांगण्यात आलं. हे ऐकून Night Shift करणार्र्यांचे डोळे मोठे झाले असतील. कारण Night Shift करणार्र्यांसाठी सकाळचा सूर्य बघणे म्हणजे १ दुर्मिळ क्षण. म्हणून मग प्रत्येकाला सोयीस्कर व्हावं म्हणून आपापल्या एरिया जवळचे Pickup Point देण्यात आले. त्याप्रमणे सगळे आपापल्या ठेप्यावर येऊन बसची वाट पाहत उभे राहिले. मी सुद्धा अगदी वेळेत जाऊन उभा राहिलो.    अहो खरचं!!

घड्याळाचे काटे जसे पुढे सरकत होते तसा उन्हाचा तडाखा वाढत होता. त्यामुळे प्रत्येक समोरून जाणारी बस ही आपलीच असावी अशी केविलवाणी नजर तिच्याकडे टाकत आणि घाम पुसत उभे होतो. शेवटी इंतजार खत्म हुआ आणि ९ वाजता बस आमच्या समोर येऊन उभी राहिली. वातानुकूलित (A/C) बस नाही हे पाहून घामांच्या धारांचा वेग अधिक वाढला. पण कंपनीचं जुनं नाव आठवलं आणि No Option म्हणत बस मध्ये चढलो. संपूर्ण Backoffice असल्यामुळे माझ्यासाठी बरेच चेहेरे नवीन होते. त्यामुळे थोडा सेट व्हायला वेळ लागला पण सगळे लवकर सेट झाले आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत धिंगाणा चालू झाला तो अगदी पोचेपर्यंत. नेहमी प्रमाणे अंताक्षरी चालू झाली. त्यातल्याच कोणीतरी एकानी वाजवायला ड्रम (वाजवायचं साधन) आणला होता. मग काय गाणारे आणि वाजवणारा हम साथ साथ है (?) म्हणत चालू झाले.

मध्येच एकाला रस्ता चुकल्याची जाणीव झाली आणि बस थांबली.मग त्यातल्यात्यात माहितगार मंडळी ड्रायवर जवळ जाऊन बसली आणि पुढचा प्रवास सुरु झाला.कसे तरी मजल दर मजल करत १ वाजता पोचलो.

उन भरपूर असल्यामुळे सगळ्यांना केंव्हा एकदा पाण्यात उतरतो असं झालं होतं.आत मध्ये गेल्यावर समजलं की जेवायची वेळ २.३० वाजेपर्यंतच आहे.तरी सुद्धा अर्ध्या लोकांनी पाण्याकडे धाव घेतली आणि बर्र्याच मंडळीनी आधी पेटपूजा आटोपून पाण्यात उतरायचा निर्णय घेतला.फक्त वेज असल्यामुळे नोनवेज खाणार्र्यांचे चेहेरे जरा बारीक झालेले दिसले.सेल्फ सर्विस होती त्यामुळे एकदाच पाहिजे तेवढं घेऊन आलो. बसायला खुर्र्च्या कमी होत्या म्हणून मग भारतीय बैठक मांडली.पटकन जेवलो आणि पाण्याकडे धाव घेतली.

अर्थात पाण्यात उतरणार नाही हा विचार करून गेलो होतो त्यामुळे बरोबर कपडे आणले नव्हते.पण उन सहन होत नव्हतं त्यामुळे पाणी बघून राहवलं नाही आणि पाण्यात उडी टाकली.पाण्यात उडी टाकताच प्रवासाचा थकवा नाहीसा झाला आणि body temperature ४० वरून २० वर आलं.

वेव पूल ( कृत्रिम लाटा) मध्ये मनसोक्त सगळे मजा लुटत होते.काहीजण पोहोण्याच्या एक एक कला सदर करत होते.जास्तवेळ पाण्यात कोण राहत? ह्या टोकावरून त्या टोकाला आधी कोण जाणार? अशा स्पर्धा लागल्या होत्या!. सहज म्हणून माझी नजर एका कोप्र्र्याला गेली तर तिथे काही जणांनी पोहोण्याचे क्लासेस देखील चालू केले होते. आणि पाण्याबाहेर बसलेले त्यांचा हुरूप वाढवत होते.बरेच जण पाण्यावर पाठीवर झोपून relax होत होते.

बराच वेळ वेव पूलची मजा लुटल्यानंतर आमचा ५-६ जणांचा ग्रुप रेनडान्सच्या फ्लोरकडे वळला.तिथे थोडावेळ थिरकून लोकांना Water Park कडे आकर्षित करणाऱ्या स्लाईडस्कडे आम्ही आमचा मोर्चा वळवला.इनमिन २ स्लाईडस होत्या त्यामुळे तिथे गर्दी बरीच होती.अर्धा तास रांगेत उभं राहिल्यानंतर माझा कसातरी नंबर लागला.आमच्या आधी ज्यांनी केलं होतं ते बघून पोटात गोळा आला होता.एका ट्यूब मध्ये दोघांना बसवत होते.म्हणून मग मी आणि अजून एक जण असे त्या ट्यूब मध्ये बसलो. तिथे कव्हरड आणि ओपन अशा दोन स्लाईडस होत्या.पण आम्ही कव्हरड स्लाईड मधून जाण्याचा निर्णय घेतला. वरून सुटल्यानंतर अक्षरशः १५ सेकंदात आम्ही खाली पोचलो. आणि सुटकेचा निश्वास टाकला.


तेवढ्यात Snaks are ready अशी एक announcement झाली. आता जवळपास ३-४ तास पाण्यात राहिल्यामुळे पुन्हा एकदा पोटात कावळे ओरडायला लागले होते. म्हणून मग सगळ्यांनी एकमताने थांबायचा निर्णय घेतला आणि आपापली पोटं भरून गाडीत जाऊन बसले.

तिथून निघायला जवळपास ६.३० वाजले होते. सगळे दमले असल्यामुळे परतीचा मार्ग एकदम शांत होता.माझं उतरायचं ठिकाण आलं आणि सगळ्यांना "उद्या भेटू" असं म्हणत उतरलो आणि घराची वाट धरली.